Viral Video: ऐकावं ते नवलचं! पुण्यात चक्क झाडाच्या फांदीला आले बटाटे; व्हिडिओ पाहू तुम्हीही व्हाल अवाक, Watch

कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय.

Potato Tree (Photo Credit - Twitter/ @mataonline)

Viral Video: पुण्यात निसर्गाचा एक चमत्कार घडला आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. जर तुम्हाला विचारलं की बटाटे कुठे येतात? तर तुम्ही नक्कीच जमिनीखाली असं उत्तर द्याल. पण बटाटे जर टोमॅटोप्रमाणे जमिनीच्या वर झाडाच्या फांदीलाच आले तर? पुण्यात बटाटे चक्क झाडाच्या फांदीला आले आहेत. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावात चक्क झाडाला बटाटे लागले आहेत. युवा शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात असणाऱ्या झाडाला चक्क 18 ते 19 बटाटे आले आहेत. हे बटाटे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. (हेही वाचा - Viral Video: अनाथ बकरीच्या पिल्ल्यांना कुत्रीने पाजलं दूध; Tamil Nadu च्या Virudhunagar मधील घटना (Watch Video))

झाडावर लटकलेल्या बटाट्याचा व्हिडिओ पहा -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)