'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचा तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या राज्यांत जावे'-  Udayanraje Bhonsle

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत

Udayanraje Bhosale | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर राज्यपाल बोलताना म्हणाले होते, ‘गुजराती आणि राजस्थानी लोकांना मुंबई आणि ठाणे शहरातून हाकलून दिल्यास इथे काहीही शिल्लक राहणार नाही. देशाची आर्थिक राजधानी असल्याचा टॅगही मुंबईतून हिसकावण्यात येईल.’ आता या वक्तव्यावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकच नाही तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement