Sharad Pawar On Resignation: माझ्या राजीनाम्यावर माझा पक्ष एवढी तीव्र प्रतिक्रिया देईल याची मला कल्पना नव्हती - शरद पवार
त्यामुळे मी बाजूला पडून पुढच्या पिढीला संधी देण्याचा विचार केला, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar On Resignation: माझ्या राजीनाम्यावर माझा पक्ष एवढी तीव्र प्रतिक्रिया देईल याची मला कल्पना नव्हती. अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही मला माझा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. वर्षभरात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बाजूला पडणे योग्य होणार नाही. आम्ही विरोधकांना एकत्र करण्याचे काम करत आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी मी विचारपूर्वक तयारी केली होती. माझ्याकडे अजून 3 वर्षे संसदेत आहेत आणि भविष्यात राज्य आणि देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी घेऊ शकेल अशी चांगली टीम तयार करण्याचा माझा विचार होता. त्यामुळे मी बाजूला पडून पुढच्या पिढीला संधी देण्याचा विचार केला, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Ajit Pawar On Sharad Pawar: शरद पवार यांचा निर्णय आणि पत्रकार परिषदेतील दांडी; अजित पवार यांंनी सांगितला मनोदय)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)