Hind Kesari 2023: महाराष्ट्राचा अभिजीत कटके ठरला हिंद केसरी 2023 चा मानकरी

मुळचा पुण्याजवळील वाघोली येथील अभिजित पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे.

Hind Kesari 2023

महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कटके हा 2023 चा ‘हिंदकेसरी’ किताबाचा मानकरी ठरला आहे. त्याने हरियाणाचा पैलवान सोमवीरवर विजय मिळवत अजिंक्यपद प्राप्त केले. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळवला. मुळचा पुण्याजवळील वाघोली येथील अभिजित पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. भूगाव येथे 2017 मध्ये झालेल्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात त्याने 'महाराष्ट्र केसरी'ची गदा प्राप्त केली. त्यानंतर आता अभिजीत हिंद केसरीचाही मानकरी ठरल्याने राज्यभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now