मुंबईकरांसाठी खुशखबर! BMC बांधणार दहिसर लिंक रोड ते भाईंदरपर्यंत प्रस्तावित 6 किमी लांबीचा रस्ता- Minister Aaditya Thackeray
हा प्रस्तावित उत्तरेकडील किनारपट्टीच्या रस्त्याचा एक भाग आहे, परंतु हा अत्यावश्यक असल्याने या रस्त्याचे बांधकाम युद्धपातळीवर होईल
मुंबईमध्ये विविध परिसरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने बीएमसी काम करत असते. अशात मुंबई-मीरा भाईंदर कनेक्टिव्हिटीची गरज वाढली आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन सध्याचा दहिसर लिंक रोडपासून भाईंदरपर्यंत प्रस्तावित 6 किमी लांबीचा व 45 मीटर रुंदीचा रस्ता बीएमसी बांधणार आहे. यातील 1.5 किमी मार्ग एमसीजीएममध्ये, तर 4.5 किमी मार्ग मीरा भाईंदर कॉर्पोरेशनमध्ये असेल. मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली.
हा प्रस्तावित उत्तरेकडील किनारपट्टीच्या रस्त्याचा एक भाग आहे, परंतु हा अत्यावश्यक असल्याने या रस्त्याचे बांधकाम युद्धपातळीवर होईल. दहिसर पश्चिम ते भाईंदर या कनेक्टिव्हिटीमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल तसेच दहिसर पूर्व आणि WEH वरील रहदारी आणि दबाव कमी होईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Advertisement
Advertisement
Advertisement