Girls Beat ST Bus Conductor With Slippers: रत्नागिरीत 2 विद्यार्थिनींनी एसटी बस कंडक्टरला केली चप्पलने मारहाण; मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप (Watch Video)

सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, बस कंडक्टरने चालत्या बसमध्ये मुलींचा विनयभंग केला, त्यानंतर मुलींनी बस थांबवली आणि जमावासमोर त्याला मारहाण केली.

Girls Beat ST Bus Conductor With Slippers

Girls Beat ST Bus Conductor With Slippers: महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये दोन विद्यार्थिनी बस कंडक्टरला मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. मुली रस्त्याच्या मधोमध बस कंडक्टरला चप्पलने मारहाण करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, बस कंडक्टरने चालत्या बसमध्ये मुलींचा विनयभंग केला, त्यानंतर मुलींनी बस थांबवली आणि जमावासमोर त्याला मारहाण केली. पंचनदी येथील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनी बसमध्ये प्रवास करत असताना ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. बस कंडक्टरने बसमधील मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे, मात्र लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. या कंडक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. (हेही वाचा: Bandra Gang Rape Case: वांद्रे मध्ये 18 वर्षीय मुलीला गुंगीचं औषध देऊन सामुहिक बलात्कार; एक आरोपी फरार दुसरा अटकेत)

रत्नागिरीत 2 विद्यार्थिनींनी एसटी बस कंडक्टरला केली चप्पलने मारहाण-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now