Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर येथील होर्डिंग अपघातातील मृतांमध्ये Kartik Aaryan च्या नातेवाईकांचा समावेश; अंत्यसंस्काराला अभिनेत्याची उपस्थिती- Reports

वृत्तानुसार, मृतांची ओळख निवृत्त एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) महाव्यवस्थापक मनोज चांसोरिया (60) आणि त्यांची पत्नी अनिता (59) अशी आहे, जे कार्तिकचे नातेवाईक होते.

Kartik Aaryan (Photo Credits: X)

Ghatkopar Hoarding Collapse: नुकतेच मुंबईत धुळीचे प्रचंड वादळ आले, त्यामुळे शहरातील घाटकोपर परिसरात एक मोठे होर्डिंग कोसळले. या भीषण अपघातात 16 जणांना आपला जीव गमवावा लागला. रिपोर्ट्सनुसार, घाटकोपर होर्डिंग कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मृतांची ओळख निवृत्त एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) महाव्यवस्थापक मनोज चांसोरिया (60) आणि त्यांची पत्नी अनिता (59) अशी आहे, जे कार्तिकचे नातेवाईक होते. अहवालानुसार, अभिनेता गुरुवारी त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होता. चांसोरिया आणि त्यांची पत्नी मध्य प्रदेशातील त्यांच्या घरी परतत असताना होर्डिंगजवळील पेट्रोल पंपावर त्यांच्या कारची इंधन टाकी भरण्यासाठी थांबले होते, तेव्हा होर्डिंग त्यांच्या गाडीच्या अगदी वर पड. या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. हे जोडपे व्हिसा अर्जासाठी मुंबईला आले होते. त्यांचा अमेरिकेमध्ये असलेला मुलगा यश याला भेटण्यासाठी ते जाणार होते. (हेही वाचा: Ghatkopar Hoarding Collapse Accident: मुंबईमध्ये नवीन होर्डिंग लावण्याची परवानगी दिली जाणार नाही; घाटकोपर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now