Ganpatipule: गणपतीपुळे येथे व्हेल माशाचे पिल्लू अजूनही समुद्र किनाऱ्यावरच; वाचवण्यासाठी ग्रामस्थ, वन विभागाचे प्रयत्न सुरु (Watch Video)

मत्स्य विभागाच्या बोटीच्या सहाय्याने व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात ओढत नेण्यात येणार आहे.

व्हेल मासा

गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर व्हेल माशाचे छोटे पिल्लू वाहत आले असल्याची माहिती काल मिळाली होती. या माशाला वाचवण्यासाठी व त्याला परत समुद्रात सोडण्यासाठी ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरु होते. मात्र अजूनही हे पिल्लू किनाऱ्यावरच असल्याचे समजत आहे. साधारण 36 तास उलटून गेले आहेत व हे पिल्लू किनाऱ्यावर अजूनही जिवंत आहे. या माशाचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. मत्स्य विभागाच्या बोटीच्या सहाय्याने व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात ओढत नेण्यात येणार आहे. सध्या हे पिल्लू किनाऱ्यावरील वाळूमध्ये अडकले आहे व अजूनही त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. समुद्रात जाईपर्यंत हे पिल्लू जिवंत राहावे म्हणून ग्रामस्थ, अधिकारी, पर्यटक आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. कचरा आणि खाद्यपदार्थ समुद्रात किंवा किनाऱ्यावर टाकल्यावर छोटे मासे येथे व हा व्हेल हे छोटे मासे खाण्यासाठीच आला असावा आणि समुद्राला ओहोटी असल्याने व्हेल माशाचे पिल्लू वाळूत अडकून पडले असावे. (हेही वाचा: Mumbai Air Pollution: दिवाळीच्या एका दिवसानंतर मुंबईमधील प्रदूषणात प्रचंड वाढ; AQI 234 पर्यंत वाढला, 'खराब' हवेत श्वास घेणेही कठीण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)