Ganpati Special Local Trains: प्रवाशांना दिलासा! मध्य रेल्वे 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान चालवणार CSMT आणि Kalyan/Thane/Panvel दरम्यान गणपती विशेष लोकल; जाणून घ्या वेळा

Mumbai Local| X

Ganpati Special Local Trains: संपूर्ण महाराष्ट्रात 10 दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईत तर या सणाची मोठी धामधूम पहायला मिळते. आज या गणपती उत्सवाचा सहावा दिवस आहे. येत्या मंगळवारी, 17 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होईल. अशात या दहा दिवसांमध्ये मोठ्या संख्येने लोक विविध मंडळांचे गणपती पाहण्यासाठी बाहेर पडतात. भाविक गेल्या काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या विविध भागात गर्दी करत आहेत. लोकांची ही होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेने चोख बंदोबस्त केला आहे. मध्य रेल्वे मुंबई विभाग 14 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत सीएसएमटी ते कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यान गणपती विशेष उपनगरीय लोकल चालवणार आहे. या गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. या अंतर्गत अगदी पहाटेपर्यंत नऊ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. (हेही वाचा: Unreserved Special Trains For Ganpati Festival: गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वे चालवणार अनारक्षित विशेष गाड्यांच्या 14 अतिरिक्त फेऱ्या; जाणून घ्या तपशील)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)