Ganpati Festival 2024 Special Trains For Konkan: मध्य रेल्वे कडून गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आणखी 20 विशेष ट्रेन्सची घोषणा; 7 ऑगस्ट पासून सुरू होणार बुकिंग!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांची गर्दी बघून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे सोबतच एसटी महामंडळाकडूनही विशेष बस सज्ज ठेवल्या आहेत.

Train | (Photo Credits: X)

मध्य रेल्वेकडून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍यांची गर्दी पाहता काही विशेष फेर्‍यांची घोषणा केली आहे. मात्र अल्पावधीतच तिकीट फुल्ल झाल्या असल्याने आता मध्य रेल्वेकडून पुन्हा 20 नव्या ट्रेनच्या फेर्‍यांची घोषणा केली आहे. या ट्रेनचं बुकिंग 7 ऑगस्ट पासून ऑनलाईन. ऑफलाईन सुरू होणार आहे. यामध्ये एलटीटी- रत्नागिरी, पनवेल-रत्नागिरी, पुणे -रत्नागिरी ट्रेन्सचा समावेश आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने 220 स्पेशल ट्रेन्स जाहीर केल्या होत्या त्यानंतर पश्चिम रेल्वे कडून काही ट्रेन्स चालवल्या जात आहेत. MSRTC Ganpati Festival 2024 Special Buses: कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी 4,300 जादा बसेस; npublic.msrtcors.com वर ऑनलाइनही बुकिंग होणार.  

मध्य  रेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन्स 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif