Gadchiroli Shocker: जंगलात सेल्फी घेणे जीवावर बेतले; हत्तीने तरुणाला चिरडले, जागीच मृत्यू, गडचिरोलीच्या कुनघाडामधील घटना

एक हत्ती जंगलात फिरत असल्याची माहिती श्रीकांत व त्याच्या साथीदारांना मिळाली. हत्ती पाहण्याच्या उत्साहात श्रीकांत आणि त्याचे दोन साथीदार गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जंगलात गेले. हत्तीसोबत सेल्फी घेण्यासाठी श्रीकांत हत्तीजवळ पोहोचताच हत्तीने त्याच्यावर हल्ला केला.

Elephant | Representational image (Photo Credits: pxhere)

महाराष्ट्रातील गडचिरोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जंगलात काम करणाऱ्या मजुराचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील आबापूर जंगलात हा अपघात झाला. येथील 23 वर्षीय मजूर श्रीकांत रामचंद्र सत्रे हा मित्रांसह जंगलात गेला होता. यावेळी त्याने जंगली हत्तीसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी हत्तीने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हत्तीच्या पायाखाली चिरडून श्रीकांतचा मृत्यू झाला. माहितीनुसार, श्रीकांत सत्रे हा नवेगाव भुजाळा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी होता. गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचे काम करण्यासाठी तो सहकाऱ्यांसोबत आला होता.

यावेळी एक हत्ती जंगलात फिरत असल्याची माहिती श्रीकांत व त्याच्या साथीदारांना मिळाली. हत्ती पाहण्याच्या उत्साहात श्रीकांत आणि त्याचे दोन साथीदार गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जंगलात गेले. हत्तीसोबत सेल्फी घेण्यासाठी श्रीकांत हत्तीजवळ पोहोचताच हत्तीने त्याच्यावर हल्ला केला. जंगली हत्तीने श्रीकांतला पायदळी तुडवले. यात श्रीकांतचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पाहून उर्वरित दोन साथीदार जीव वाचवण्यासाठी पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अधिकाऱ्यांनी कामगार आणि स्थानिक लोकांना वन्य प्राण्यांपासून दूर राहण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Viral Video: घराच्या सोफ्याच्या आत लपला होता किंग कोब्रा, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का)

हत्तीच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now