Gadchiroli: सरकारी आश्रमशाळेतील 105 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; 73 मुलींची प्रकृती गंभीर, उपचार सुरु

मुलींना उलट्या आणि हगवणचा त्रास सुरू झाला. त्यांनतर यातील काही मुलींना रुग्णालय दाखल करण्यात आले, इतक्यात अजून काही मुलींची प्रकृती खालावली. अशाप्रकारे एकूण 105 मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Food Poisoning | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या ठिकाणी धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील 105 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. यातील जवळपास 73 मुलींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आश्रम शाळेतील या विद्यार्थिनींनी दुपारच्या सुमारास कोबी, भाजी, वरण, भात असे जेवण देण्यात आले होते. त्यानंतर मुलींची प्रकृती बिघडू लागली. मुलींना उलट्या आणि हगवणचा त्रास सुरू झाला. त्यांनतर यातील काही मुलींना रुग्णालय दाखल करण्यात आले, इतक्यात अजून काही मुलींची प्रकृती खालावली. अशाप्रकारे एकूण 105 मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या 73 मुलींवर रुग्णालयात सुरु आहेत. (हेही वाचा: Dombivali Accident: डोंबिवलीत शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now