ST Employees Strike: माजी मंत्री सदाभाऊ खोत याचां एसटी कामगारांसह मानखुर्द चेकनाक्यावर ठिय्या आंदोलन

काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्यामुळ हा प्रश्न अजूनच चिघळला आहे.

(Photo Credit - Twitter)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्यामुळ हा प्रश्न अजूनच चिघळला आहे. एकीकडे न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेलेल असताना दुसरीकडे राज्य सरकारने ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केलं आहे. याच विरोधात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत (Sadabhavu khot) यांनी एसटी कामगारांसह मानखुर्द चेकनाक्यावर ठिय्या आंदोलन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)