Maharashtra: पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रस्तावाला मंजूरी, केंद्रीय राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घराणेशाही आणि बेरोजगारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठे परिश्रम घेत आहेत. ते केंद्रासोबत भागीदारीत काम करत आहे, असं मत व्यक्त राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केलं आहे.

पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) प्रस्तावाला मंजुरी दिल्याची मोठी घोषणा केंद्रीय राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे. तरी हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक इकोसिस्टमच्या विस्ताराची ही सुरुवात आहे अशी प्रतिक्रीया राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे. तसेच गेले ३ वर्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील नव्या उद्योगांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले होते. तरी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घराणेशाही आणि बेरोजगारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठे परिश्रम घेत आहेत. ते केंद्रासोबत भागीदारीत काम करत आहे, असं मत व्यक्त राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement