'Ek Din Mein Mujhe Mil Gayi Bail, Fir Se Dikhaunga Sadak Pe Khel': पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीने Rap Song बनवल्याचा दावा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटीझन्सना डीपफेकचा संशय (Watch Video)

या कथीत रॅप सॉन्गमध्ये वापरलेली भाषा अत्यत गलिच्छ आणि अपमानास्पद असून या सॉन्गचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Pune Porsche Accident

पुणे येथील पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने जामीन मिळताच रॅप सॉन्ग तयार केल्याचा दावा केला जात आहे. या कथीत रॅप सॉन्गमध्ये वापरलेली भाषा अत्यत गलिच्छ आणि अपमानास्पद असून या सॉन्गचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "एक दिन में मुझे मिल गई.. फिर से दिखाऊंगा सड़क पे खेल," अशा ओळीही या गाण्यात उल्लेखल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या व्हिडिओची पुष्टी केली नाही. तसेच, पोलिसांनी या व्हिडीओला दुजोरा दिला नसला तरी अनेकांनी हा डीपफेक असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. LatestLY या व्हिडिओची पुष्टी करत नाही. या प्रकरणातील आरोपीची आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे.  (हेही वाचा, Pune Porsche Car Accident: 1 तास TV, 2 तास खेळण्याची वेळ; 'असा' असणार पुण्यातील कार अपघातातील अल्पवयीन मुलांचा बालगृहातील दिनक्रम)

व्हिडिओ

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)