ED Summons Iqbal Singh Chahal: इक्बालसिंह चहल यांना ईडीची नोटीस; 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पाठवले समन्स

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनाच्या काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

Iqbal Singh Chahal (Photo Credits: ANI/Twitter)

ईडीने बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना समन्स पाठवले आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी त्यांना हे समन्स पाठवण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनाच्या काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांना ईडीने सोमवारी कागदपत्रांसह चौकशीसाठी बोलावले आहे. बेनामी कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट देऊन 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now