Dry Days In Maharashtra: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 5 दिवस ड्राय डे; दारूची दुकाने राहणार बंद
निवडणुकीच्या काळात राज्यात ड्राय डे असणार आहेत. मुंबईत 12, 18, 19, 20 आणि 23 नोव्हेंबरला ड्राय डे असेल.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित होतील. सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे. अशात निवडणुकीच्या काळात राज्यात ड्राय डे असणार आहेत. मुंबईत 12, 18, 19, 20 आणि 23 नोव्हेंबरला ड्राय डे असेल. Doolally Craft Beers नुसार, 12 नोव्हेंबर हा संपूर्णपणे ड्राय डे असेल. पुढे 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून दारूची दुकाने बंद असतील. 19 नोव्हेंबर हा संपूर्ण ड्राय डे असेल. त्यानंतर, 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ड्राय डे असेल. 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दारूची दुकाने बंद राहणार आहेत. thane आणि पुण्यातही मुंबईप्रमाणेच ड्राय डे असणार आहे. (हेही वाचा: Silver Bricks Found In Vikroli: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत व्हॅनमध्ये सापडल्या 6500 किलो चांदीच्या विटा, पहा व्हिडिओ)
Dry Days In Maharashtra-