Drugs Smuggling in Maharashtra: 'महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी वाढली, पानाच्या दुकानातही मिळतात ड्रग्ज'; राष्ट्रवादी-एससीपी नेते Jayant Patil यांचा दावा

लहान मुलांमधील अमली पदार्थांच्या सेवनाचे पुरावे समोर येत आहेत. पुण्यात अशी प्रकरणे समोर येत आहेत. या प्रकरणात राज्य सरकारने सक्रिय व्हायला हवे

Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

Drugs Smuggling in Maharashtra: पुणे पोर्शे अपघातानंतर महाराष्ट्रातील तरुणाईमधील ड्रग सेवनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता याबाबत राष्ट्रवादी-एससीपीचे नेते जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. पाटील म्हणतात, ‘महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी एक खूप मोठा गट किंवा टोळी तयार झाली आहे. आता पानाच्या दुकानातही ड्रग्ज मिळतात, हे मला अनेकांनी सांगितले आहे. लहान मुलांमधील अमली पदार्थांच्या सेवनाचे पुरावे समोर येत आहेत. पुण्यात अशी प्रकरणे समोर येत आहेत. या प्रकरणात राज्य सरकारने सक्रिय व्हायला हवे.’ (हेही वाचा: Pune Porsche Car Crash: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करू; CM Eknath Shinde यांचे आश्वासन)

पहा पोस्ट- 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement