Diwali 2023: वसुबारस निमित्त श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस परिधान केले पारंपरिक पोशाख व अलंकार, पहा फोटो

वसुबारस निमित्त पंढरपूरच्या श्री.विठ्ठल व श्री.रुक्मिणी मातेस पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले.

श्री.विठ्ठल व श्री.रुक्मिणी माता

महाराष्ट्रात ‘वसुबारस’ दिवसापासून दिवाळीच्या सणाची सुरुवात होते. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. आज वसुबारस निमित्त पंढरपूरच्या श्री.विठ्ठल व श्री.रुक्मिणी मातेस पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीचे नयनरम्य फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. दुसरीकडे येत्या 23 नोव्हेंबर रोजी पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येते. मात्र यंदा पहिल्यांदाच महापूजेसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. (हेही वाचा: Dhanteras 2023 Rangoli Designs: धनत्रयोदशी निमित्त कुबेर देवतेचा आर्शीवाद मिळवण्यासाठी घराबाहेर, अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स, Watch Video)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement