दिव्यांग कल्याण विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण ९३२ अनुदानित दिव्यांग शाळा / कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. या विभागात शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील १,९१२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिक्षकीय १,१६७ तसेच शिक्षकेतर ५०८ ही पदे नियमित स्वरुपात आणि २३७ पदांना बाह्यस्त्रोताद्वारे अशा एकूण १९१२ पदांना भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेच्या अनुषंगाने या उपक्रमांतील पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देऊन या पदभरतीची कार्यवाही विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विभागाचा शासन निर्णय दि.२६ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
दिव्यांग कल्याण विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण ९३२ अनुदानित दिव्यांग शाळा, कार्यशाळा आणि अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. या विभागात शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील १,९१२ पदे भरण्याबाबतचा #शासननिर्णय निर्गमित झाला आहे. pic.twitter.com/4OoFioa4It
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)