Dindoshi Rape Case: 30 वर्षीय बापाचा पोटच्या 9 वर्षीय मुलीवर बलात्कार; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
दिंडोशी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत आरोपी बापावर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहे.
मुंबई मध्ये दिंडोशी भागात 30 वर्षीय बापाने आपल्याच 9 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जून महिन्यात घडलेल्या या माहिती मुलीने आता आईजवळ दिल्यानंतर पोलिसांत त्याची रीतसर तक्रार करण्यात आली. दिंडोशी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत आरोपी बापावर कलम 65 (2), 68 (A)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून कोर्टाने 30 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नक्की वाचा: Mumbai Rape Case: मुंबईकर महिलेला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; मुंबई पोलिसांनी आरोपीच्या लुधियाना मधून आवळल्या मुसक्या.
बापाने केला पोटच्या मुलीवर बलात्कार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)