Dhananjay Munde Road Accident: परळी मध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात; छातीला किरकोळ मार

वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

परळी मध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात झालं आहे. सोशल मीडीयात त्यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काल रात्री कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला आहे. यामध्ये त्यांच्या छातीला किरकोळ मार  लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्याकडून कोणत्याही अफवांवर लक्ष न देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Jaykumar Gore Car Accident: भाजपा आमदार जयकुमार गोरे यांची कार नदीत कोसळून भीषण अपघात; प्रकृती स्थिर.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement