Devendra Fadnavis Death Threat Case: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी शरद पवार यांचा कार्यकर्ता योगेश सावंत अटकेत

कोर्टाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

उपमुख्यमंत्री, गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी सांताक्रुझ पोलिस स्टेशन कडून योगेश सावंत नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आणि जीवेमारण्याच्या धमकी प्रकरणी अटक केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी कोर्टात दाखल केले. कोर्टाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. योगेश सावंत हा शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे. आज रोहित पवारांनी आपण त्याची भेट घेणार असल्याचं सांगत योगेशची पाठराखण केली आहे.

पहा ट्वीट

रोहित पवार यांची प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now