Devendra Fadnavis आणि इतर भाजप नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर यलो गेट पोलिस ठाण्यात नेण्यात आले (Watch Video)

दुपारी मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांना ताब्यात घेतले

Devendra Fadnavis | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी दुपारी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, बुधवारी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर प्रमुख नेते निदर्शने करत होते. दुपारी मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांना ताब्यात घेतले. भाजप नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मेट्रो सिनेमासमोरील बॅरिकेड्सही हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना यलो गेट पोलिस ठाण्यात आणले गेले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement