Covid-19 च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आपला वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय; लोकांना केले 'हे' आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar | (File Photo)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते व हितचिंतकांनी गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या कोविडविरोधी लढ्यासाठी द्यावा असेल श्री.पवार यांनी सांगितले आहे.

तसेच कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटीकरिता येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरांसारखे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement