Defamation Case: राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याला Aaditya Thackeray यांचे उत्तर, जाणून घ्या काय म्हणाले
एकनाथ शिंदे गटाने 2000 कोटींना शिवसेनेचे चिन्ह विकत घेतल्याचा आरोप करत ठाकरे आणि राऊत यांनी केलेल्या काही विधानांविरोधात शेवाळे यांनी दाखल केलेल्या दाव्याला उत्तर म्हणून हे निवेदन देण्यात आले आहे.
नेते राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या टीकेसंदर्भात याचिका दाखल केली होती. एकनाथ शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याला विरोध करताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, राजकारणात एकमेकांच्या वर्तनावर भाष्य करणे ही राजकारण्यांची नेहमीची पद्धत आहे आणि सार्वजनिक व्यक्तींनी अतिसंवेदनशील असू नये, कारण ते त्यांच्यावरील सर्व टीका पूर्णपणे दाबून टाकतील. शेवाळेंसारख्या राजकारण्यांनी त्यांच्यावर होणारी टीकाही स्विकारायला हवी. एकनाथ शिंदे गटाने 2000 कोटींना शिवसेनेचे चिन्ह विकत घेतल्याचा आरोप करत ठाकरे आणि राऊत यांनी केलेल्या काही विधानांविरोधात शेवाळे यांनी दाखल केलेल्या दाव्याला उत्तर म्हणून हे निवेदन देण्यात आले आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यानच्या दुर्घटनेवर राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सल्ला)