Dasara Melava 2023 Live Streaming: मुंबईमध्ये शिवसेनेचे दोन दसरा मेळावे; पहा उद्धव ठाकरे आणि सीएम एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण (Video)
आज संध्याकाळी सात वाजल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निशाण्यावर असतील.
'दसरा मेळावा' ही शिवसेनेची परंपरा आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक मुंबईमध्ये येत असतात. यंदाही शिवसेना फुटीनंतर होणाऱ्या दुसऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. दसऱ्यानिमित्त दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. यंदाही या दसऱ्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी सात वाजल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निशाण्यावर असतील. यासह ते अजित पवार यांच्याबद्दल काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडून या मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे.
दुसरीकडे आझाद मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे. आझाद मैदानावर तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. निवडणूक आयोगासमोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद जिंकला. त्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे लागले आहे. तुम्हीदेखील घरी बसून या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. (हेही वाचा: Rohit Pawar Sangharsh Yatra: विजयादशमीचा मुहूर्त, रोहित पवार यांची संघर्ष यात्रा आजपासून सुरु; जाणून घ्या कसा असेल प्रवास)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)