Controversial Content About Sambhaji Maharaj: महाराष्ट्र सायबरने Wikipedia ला पाठवला ईमेल; छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती
महाराष्ट्र सायबरने विकिपीडियाला ईमेल पाठवून छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती केली आहे. आवश्यक कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आल्याची पुष्टी एका अधिकाऱ्याने केली.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त मजकूर अपलोड करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र सायबर सेल गुन्हा दाखल करणार आहे. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, हा कंटेंट सामाजिक अशांतता निर्माण करू शकतो, त्यामुळे आता याबाबत चार ते पाच व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी अनुचित माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलिसांना विकिपीडियाशी संपर्क साधून आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले, ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मवर ऐतिहासिक माहिती चुकीच्या पद्धतीने सादर केली जाते अशा प्रकारची सामग्री आम्ही स्वीकारणार नाही. मी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. आता महाराष्ट्र सायबरने विकिपीडियाला ईमेल पाठवून छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती केली आहे. आवश्यक कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आल्याची पुष्टी एका अधिकाऱ्याने केली. (हेही वाचा: Chhatrapati Sambhaji Maharaj's Samadhi: पुणे जिल्ह्यातील 'तुळापूर' आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ, तर वढू बुद्रुक समाधीस्थळ; जाणून घ्या या दोन्ही ठिकाणांबद्दल)
Controversial Content About Sambhaji Maharaj:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)