Pune By-Elections: कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार, पक्षाकडून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर; नाना पटोले यांची माहिती

नाना पटोले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कसबा विधानसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे.

Nana Patole | (Photo Credits: Twitter)

Pune By-Election: कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कसबा विधानसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून श्री. रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)