Congress MLA Zeeshan Siddique Joins NCP: काँग्रेसला झटका! काँग्रेसचे आमदार जीशान सिद्दिकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश? अजित पवारांसोबत घेतला जन सन्मान यात्रेत भाग (Watch Video)
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज वांद्रे पूर्व भागात आहे. या मुहूर्तावर झिशान अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Congress MLA Zeeshan Siddique Joins NCP: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरून असून ते राज्यभरात ‘जनसन्मान यात्रा’ (Jan Samman Yatra) काढत आहे. आज अजित पवार यांनी मुंबईत जन्मसन्मान यात्रा काढली. या जनसन्मान यात्रेत काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांनी सहभाग घेतला. त्यांच्या या सहभागामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. झिशान सिद्दीकी काँग्रेस पक्षाचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज वांद्रे पूर्व भागात आहे. या मुहूर्तावर झिशान अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)