Hanuman Chalisa By Congress: कर्नाटकात विधानसभा निवडणूकीतील दणदणीत विजया नंतर महाराष्ट्रात कॉंग्रेस नेत्यांनी वाचली 'हनुमान चालीसा' (Watch Video)

मुंबई मध्ये भाई जगताप, संजय निरूपम यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी हनुमान चालीसा वाचली आहे.

Maharashtra Congress | Twitter

कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये 'बजरंग बली' देखील प्रचारामध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. पण कर्नाटकवासियांनी सत्ताबदलाची परंपरा कायम ठेवत भाजपाच्या हातातील सत्ता कॉंग्रेसच्या हातात नेऊन ठेवली. दरम्यान या निवडणूक निकालानंतर कर्नाटकात कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये स्फुरण चढले आहे. पण त्या सोबतीने महाराष्ट्रातही कॉंग्रेस नेत्यांनी सेलिब्रेशन केले आहे. मुंबई मध्ये अंधेरी परिसरामध्ये  भाई जगताप, संजय निरूपम यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी हनुमान चालीसा चे पठण केले  आहे. Karnataka Election Results 2023: काँग्रेसच्या विजयानंतर बेळगावमध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे लावण्यात आल्याचा नेटिझन्सचा दावा, पाहा व्हिडिओ .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now