Congress Announces Guarantees For Maharashtra: महिलांना 3 हजार, बेरोजगारांना 4 हजार; महाराष्ट्रासाठी राहुल गांधींकडून काँग्रेसच्या मोठ्या घोषणा
नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी पाच हमीपत्रे जारी केली आहेत. यामध्ये महिलांना मासिक आर्थिक मदत, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेरोजगारांना आर्थिक मदत, कुटुंबांसाठी आरोग्य विमा आदींचा समावेश आहे.
Congress Announces Guarantees For Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटप झाल्यानंतर आता निवडणूक आश्वासनेही दिली जाऊ लागली आहेत. नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी पाच हमीपत्रे जारी केली आहेत. यामध्ये महिलांना मासिक आर्थिक मदत, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेरोजगारांना आर्थिक मदत, कुटुंबांसाठी आरोग्य विमा आदींचा समावेश आहे.
महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी पार पडली. यावेळी महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रसिद्ध केला. राहुल गांधी यांनी मंचावरून भाजप आणि शिंदे सरकारवर उघड निशाणा साधला. प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात, महिलांना दरमहा 3000 रुपये आणि महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिला व मुलींना मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेडीसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन, जातीनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार, 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे, तसेच बेरोजगार तरुणांना दरमहा 4000 रुपयांपर्यंतची मदत, अशा घोषणांचा समावेश आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेसाठी महाराष्ट्रात BJP कडून होणार जोरदार प्रचार; उद्या Amit Shah आणि Yogi Adityanath यांच्या सभांचे आयोजन)
Congress Announces Guarantees For Maharashtra:
#MaharashtraAssemblyElection | Congress announces 5 guarantees for Maharashtra- Rs 3000 per month to women and free bus travel for women and girls under Mahalakshmi Yojana. Loan waiver of up to Rs 3 lakh to farmers and incentive of Rs 50,000 for regular loan repayment. Will… pic.twitter.com/YmOTj2uGOr
— ANI (@ANI) November 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2024 09:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

