Maharashtra Assembly Winter Session 2022: अडीच महिन्यांच्या बाळासह अधिवेशनाला आलेल्या आमदार Saroj Ahire यांचं CM Eknath Shinde यांच्याकडून भेट घेऊन कौतुक!
सरोज अहिरे या आपलं अडीज महिन्यांचं बाळ प्रशंसक वाघ सोबत आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाला हजर झाल्या आहेत.
देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे आज नागपूर विधिमंडळ अधिवेशनाला आपल्या अवघ्या अडीज महिन्यांच्या बाळासह पोहचल्या. अशाप्रकारे बाळाला घेऊन विधिमंडळात आमदार आल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जातीने सरोज अहिरे यांची भेट घेऊन बाळाची आणि त्यांची आस्थेने चौकशी केली. यावेळी सरोज अहिरे यांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते. नक्की वाचा: Nagpur Maharashtra Assembly Winetr Session 2022: NCP MLA Saroj Babulal Ahire विधानभवनात 'आई' आणि 'लोकप्रतिनिधी' दोन्ही भूमिकेत; अडीज महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजर .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)