Dead Mouse Found in Barbeque Nation Veg Meal Box? मुंबईच्या बार्बेक्यू नेशनच्या शाकाहारी जेवणामध्ये मृत उंदीर आढळल्याचा दावा; दूषित अन्न खाल्ल्यानंतर व्यक्ती रुग्णालयात दाखल

द्ध शाकाहारी असलेले राजीव शुक्ला यांनी जेवणाच्या पाकिटातून 'दाल मखनी' काढली आणि ती खायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना त्यात एक मेलेला उंदीर दिसला.

Dead Mouse Found in Barbeque Nation Veg Meal Box?

Dead Mouse Found in Barbeque Nation Veg Meal: मुंबईतील एका मोठ्या आणि लोकप्रिय रेस्टॉरंटच्या जेवणात मृत उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील वकील राजीव शुक्ला यांनी मुंबईमध्ये बार्बेक्यू नेशन येथून शाकाहारी जेवण मागवले होते. जेव्हा त्यांनी ते अन्न खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना त्यात एक मेलेला उंदीर आढळला. शुक्ला यांनी सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे. अहवालानुसार, 35 वर्षीय शुक्ला पर्यटनासाठी मुंबईत आले होते. त्यांनी 8 जानेवारी रोजी बार्बेक्यू नेशनच्या वरळी आउटलेटवरून रात्रीचे जेवण मागवले होते. या शाकाहारी थाळीची किंमत सुमारे 641 रुपये होती.

शुद्ध शाकाहारी असलेले राजीव शुक्ला यांनी जेवणाच्या पाकिटातून 'दाल मखनी' काढली आणि ती खायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना त्यात एक मेलेला उंदीर दिसला. त्यानंतर त्यांना अन्नातून विषबाधा झाली. नंतर त्यांना बीएमसीच्या बीवायएल नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर तीन दिवसांपेक्षा जास्त काळ उपचार करण्यात आले. शुक्ला यांनी दूषित अन्नाची छायाचित्रे देखील शेअर केली आहेत, ज्यात शाकाहारी जेवणाच्या बॉक्समध्ये मृत उंदीर दिसत आहे. (हेही वाचा: Panipuri Payment Dispute: फुकटखाऊ गुंडांच्या बेदम मारहाणीत पाणीपुरी विक्रेत्याचा मृत्यू)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement