Loudspeaker Row: भोंग्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत.
धार्मिक स्थळांवरील भोंग्बायाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी राज्य सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जवळपास सर्वच पक्षांनी उपस्थित राहण्यास संमती दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत असे सांगण्यात आले आहे. तसेच नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)