Chhatrapati Sambhajinagar: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक Sunil Tupe यांच्या 7 वर्षांच्या मुलाचे अपहरण; अपहरणकर्त्यांनी मागितली 2 कोटींची खंडणी, घटना कॅमेऱ्यात कैद (Video)

याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

Famous Builder Sunil Tupe's 7-Year-Old Son Kidnapped (Photo Credits: X/@RahulAsks)

छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे एका प्रसिद्ध बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री सिडको एन-4 परिसरातील सेंट्रल मॉलजवळ, घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर, अज्ञात व्यक्तींनी मुलाचे अपहरण केले. महत्वाचे म्हणजे घटनेच्यावेळी मुलाचे वडील त्याच्यासोबत होते. अपहरणकर्त्यांनी 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये एक काळ्या रंगाची कार मुलाजवळ थांबताना दिसते, त्यानंतर काही क्षणांतच अज्ञात व्यक्ती मुलाला कारमध्ये ओढून नेतात आणि तेथून पळून जातात. मुलाचे वडील, सुनील तुपे, हे परिसरातील प्रसिद्ध बिल्डर आहेत. मंगळवारी रात्री जेवणानंतर ते मुलाला फिरायला घेऊन गेले होते. घटनेच्या वेळी ते मुलासोबत चालत होते, तर मुलगा सायकलवर होता. त्यांनी संपूर्ण घटना पाहिली पण अपहरणकर्त्यांना रोखण्यात ते असहाय्य होते. घटनेनंतर काही वेळातच अपहरणकर्त्यांनी फोन करून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली.

याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. अपहरणकर्त्यांनी वापरलेल्या फोन कॉलचा शोध घेतला असता, तो सिल्लोड तालुक्यातून आल्याचे आढळले आहे. मुलाला लवकरात लवकर सुरक्षितपणे शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा: Mumbai Murder Case: डोंगरी परिसरामध्ये भांडणाच्या रागामधून डोक्यात दगड घालून हत्या)

सुनील तुपे यांच्या 7 वर्षांच्या मुलाचे अपहरण- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now