Chhatrapati Sambhaji Nagar: औरंगाबादच्या नामांतराला खासदार Imtiaz Jaleel यांचा विरोध; काढणार भव्य मोर्चा

उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यास, तर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली.

Imtiaz Jaleel | (Photo Credits: Facebook)

आज देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियाद्वारे माहिती दिली की, उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यास, तर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली. गेले अनेक वर्षे या दोन्ही शहरांचे नामांतर करण्याबाबत चर्चा होती.

आता यावर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. ते म्हणतात, 'औरंगाबाद आमचे शहर आहे, होते आणि राहील. आता औरंगाबादसाठी आमच्या शक्ती प्रदर्शनाची वाट पहा. आपल्या लाडक्या शहरासाठी आम्ही भव्य मोर्चा काढत आहोत. आमच्या शहराच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या शक्तींचा पराभव करण्यासाठी औरंगाबादवासियांनो सज्ज व्हा. या नामांतराचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही लढू.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)