Coronavirus: कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर छगन भुजबळ यांनी केले हे अवाहन

कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येताच वैद्यकीय उपचार घेत असताना भुजबळ यांनी ट्विटरद्वारे अवाहन केले आहे. भुजबळ यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी.

Chhagan Bhujbal (Photo Credits: ANI)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येताच वैद्यकीय उपचार घेत असताना भुजबळ यांनी ट्विटरद्वारे अवाहन केले आहे. भुजबळ यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात छगन भुजबळ यांनी सक्रीय सहभाग नोंदवला आहोता. अधिवेशन संपल्यानंतर भुजबळ यांना ताप आल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढत असल्याचे चित्र काही दिवसांपासून पुढे येत होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement