Chandrapur Crime: चंद्रपुरातील राजुरा शहरात गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

हा गोळीबार कोणत्या कारणासाठी झाला यावर प्रश्नचिन्ह आहे. सध्या आरोपी फरार असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Gun Shot | Pixabay.com

चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. चंद्रपुरातील राजुरा शहरात (Rajura City Firing) रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पुन्हा एकदा गोळीबार केला. या गोळीबारात भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीला दोन गोळ्या लागल्या. यातील एक गोळी थेट छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान चंद्रपूरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. (हेही वाचा - Irshalwadi Landslide: इर्शाळवाडी घटनेत प्रशासनाचा मोठा निर्णय, लवकरच शोधमोहिम थांबवण्याचा निर्णय)

या गोळीबारात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा सचिन डोहे (वय 27) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या गोळीबारात लल्ली नामक आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. जखमीला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील सोमनाथपुर वार्डात रात्री नऊच्या सुमारास अज्ञातांनी सचिन डोहे यांच्या घरासमोरून एका व्यक्तीवर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज आल्याने पूर्वशा घराबाहेर आल्या. यात पूर्वशा यांना दोन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा गोळीबार कोणत्या कारणासाठी झाला यावर प्रश्नचिन्ह आहे. सध्या आरोपी फरार असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now