Irshalwadi Landslide: इर्शाळवाडी घटनेत प्रशासनाचा मोठा निर्णय, लवकरच शोधमोहिम थांबवण्याचा निर्णय

. सलग तीन दिवसांपासूंन सुरू असलेले बचावकार्य आणि शोधमोहिम थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Irshalwadi Landslide: इर्शाळवाडी घटनेत प्रशासनाचा मोठा निर्णय, लवकरच शोधमोहिम थांबवण्याचा निर्णय
Irshalwadi Landslide (image Credit - ANI Twitter)

Irshalwadi Landslide: मुसळधार पावसाने रायगड येथील इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. संपुर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारी ही घटना आहे. या  दुर्घटनेत आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बचावकार्य अद्यापही कामे करत आहे तर या दुर्घटनेतून १०० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. बचावकार्य सलग तीन दिवस कामे करत आहे. दरम्यान प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान तीन दिवस उलटून झाले आता प्रशासनाने शोधमोहिम थांबवण्याचे निर्णय घेतला आहे. उदय सांमत यांनी ही बातमी सुत्रांना दिली आहे. पोलिस, रिक्सुटीम सलग तीन दिवस कार्य करत आहेत. इर्शाळवाडीत जीवितहानी भरपुर प्रमाणात झाली.

या दुर्घटनेत ५७ जण बेपत्ता असून त्यांना मृत घोषित करण्याचा निर्णय करण्यात येणार आहे. आज पासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. संपुर्ण गावच उध्दवस्त झाले आहे. त्यामुळे लवकरच ग्रामस्थांचे पुनवर्सन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सलग तीन दिवसांपासून एनडीआरएफच्या माध्यमातून बचावकार्य राबिवली जात आहे. दरम्यान राज्याचे मंत्री उदय सांमत यांनी याच पार्श्वभुमीवर त्यांनी बैठक घेतली. आणि या बैठकीत निर्णय घेतला की, बचावकार्य थांबविण्यात येईल, बेपत्ता असलेल्यांना मृत घोषित केले जाईल.

शोधकार्यात पावसामुळे येत असलेल्या अनेक अडचणी आणि इतर कारणांमुळे ही शोधमोहिम थांबवली जाणार असून बेपत्ता नागरिकांना मृत घोषित केले जाणार आहे. मुसळधार पावसाने बचावकार्य करताना अडचणींना सामोरे जावे लागते. एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक ट्रेकर्स, जवान आणि सिडकोने पाठवलेले मजूर यांच्यामार्फत बचावकार्य सुरू होते. यासह स्नायफर डॉग स्क्वाड यांची देखील शोध कार्यात मदत घेतली गेली. बचावकार्यासाठी एनडीआरएफची चार पथके, एकूण १०० जवान, टीडीआरएफचे ८० जवान, स्थानिक बचाव पथकाच्या ५ टीम यांनी मदत केली.

(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2023 09:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).