Chandrahar Patil Joins Shiv Sena (UBT): डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना-युबीटीमध्ये प्रवेश (Watch Video)

पक्षातून नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांचे पक्षात स्वागत केले.

Chandrahar Patil Joins Shiv Sena (UBT)

Chandrahar Patil Joins Shiv Sena (UBT): डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (UBT) प्रवेश केला आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षातून नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांचे पक्षात स्वागत केले. अहवालानुसार, चंद्रहार पाटील हे शिवसेनेकडून सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी पाटील म्हणाले, 'मी जास्त काही बोलणार नाही. पण मला खात्रीने सांगायचे आहे की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्याचा निकाल हा पहिला निकाल असेल. मला आपल्या कुटुंबात सहभागी केल्याबद्दल आपले आभार मानतो.' (हेही वाचा: Mahayuti Seat Sharing: तर400 पार'चा स्वप्नभंग होईल, अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात तक्रवितर्क)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement