Weather Forecast For Tomorrow: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्टसह अतिवृष्टीची शक्यता; जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज

विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे. तथापी, मराठवाड्याच्या काही भागात हलका-मध्यम पाऊस पडू शकतो.

Rain | Twitter

Weather Forecast For Tomorrow: हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा (Heavy rain in Maharashtra) इशारा दिला आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्टसह अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे. तथापी, मराठवाड्याच्या काही भागात हलका-मध्यम पाऊस पडू शकतो. हवामान विभाग तज्ञ के एस होसाळीकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊटंवरून उद्याचा हवामान अंदाज (Weather Forecast For Tomorrow) वर्तवला आहे. (हेही वाचा - Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!)

के एस होसाळीकर यांचे ट्विट - 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement