Central Railway's Ticket-Checking drive: मध्य रेल्वेने विना तिकीट प्रवाशांकडून वसूल केला 100 कोटींचा दंड
मध्य रेल्वेने 18 लाखां पेक्षा अधिक विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली आहे,
मुंबईतील गाड्यांमधील विना तिकीट (Without Ticket) प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ ही होत आहे. मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर रेल्वे प्रशासनाच्या सर्व प्रयत्नांनंतरही यावर आळा बसत नाही आहे. मध्य रेल्वेने एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत विना तिकीट प्रवास करताना पकडलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर केली. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेने मुंबई विभागात 100 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीला वेग (Ticket Checking drive) दिल्याने तब्बल अठरा लाखांपेक्षा अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांनी नेहमी वैध तिकीटासह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)