सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीचा भाग म्हणून मध्य रेल्वेकडून खेरवाडी यार्डात मोठे रूळ सुधारणा काम पूर्ण

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून मध्य रेल्वेने खेरवाडी यार्डात महत्त्वाचे रूळ सुधारणा काम हाती घेतले आहे. १३ सप्टेंबर २०२६ रोजी दोन तासांहून अधिक काळाच्या ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर हे काम पूर्ण करण्यात आले.

Photo Credit- X

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून मध्य रेल्वेने खेरवाडी यार्डात महत्त्वाचे रूळ सुधारणा काम हाती घेतले आहे. १३ सप्टेंबर २०२६ रोजी दोन तासांहून अधिक काळाच्या नियोजित ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर हे काम पूर्ण करण्यात आले. दुपारी १ वाजून १० मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत चाललेल्या या ब्लॉकमध्ये आधुनिक रूळ यंत्रसामग्री आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे काम पार पाडण्यात आले.

२०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे अडीच कोटी भाविकांनी हजेरी लावली होती, तर २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी हा आकडा चार ते पाच पटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून वेळेत आणि सुनियोजित पद्धतीने पायाभूत सुविधा उभारणीवर भर दिला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement