CR 63 hrs Special Block at Thane Began: मध्य रेल्वे कडून ठाणे रेल्वे स्थानकात फलाट रूंदीकरणाच्या कामाला सुरूवात; 2 जून पर्यंत चालणार काम
रविवार पर्यंत फलाट क्रमांक 5 म्हणजे कल्याण कडे जाणारा जलद आणि मुंबईकडे जाणार धीम्या मार्गावरील रेल्वे सेवा बंद आहे.
मध्य रेल्वेकडून 31 मे च्या मध्यरात्रीपासून प्लॅटफॉर्म रूंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. 2 जून पर्यंत विशेष ब्लॉक घेऊन मध्य रेल्वे हे काम पूर्ण करणार आहे. सध्या पूर्वीचे रूळ काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या काळात रेल्वेसेवा विस्कळीत आहे. सध्या ठाणे स्थानकात फलाट क्रमांक 2 वर मुंबईहून कल्याण कडे जाणारा धीमा मार्ग आणि कल्याण हून मुंबईकडे जाणाऱ्या 6 नंबर फलाट वर सेवा सुरू आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या 7 आणि 8 नंबर फलाटावर वळवण्यात आल्या आहेत. मात्र 5 म्हणजे कल्याण कडे जाणारा जलद आणि मुंबईकडे जाणार धीम्या मार्गावरील सेवा बंद आहे. Central Railway's 63-hour Mega Block Update: मध्य रेल्वे कडून आज मध्यरात्रीपासून फलाट रूंदीकरणाचं काम हाती; ठाणे स्थानकात 63 तर सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक!
रद्द झालेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या