'Cash for Votes' Case in Maharashtra: विरार मधील 'कॅश फॉर व्होट' प्रकरणामध्ये एक आरोपी ED कडून अटकेत; दुबईला पळून जाण्याचा होता प्लॅन

Nagani Akram Mohammad Shafi दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अहमदाबाद मधून त्याला अटक करण्यात आली आहे.

Representational Image (Photo Credits: File Image)

Enforcement Directorate कडून आज महाराष्ट्र विधानसभा मतदाना दिवशी एकाला 'Cash for Votes'  प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, आरोपी . Nagani Akram Mohammad Shafi  दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. 19 नोव्हेंबरला पोलिसांनी भाजपा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर या घडामोडींना वेग आला. विरार मध्ये एका हॉटेलात पैसे वाटपाचे आरोप झाल्यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दोघांवर आहे. बविआ चे हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंकडे 5 कोटी असल्याचा दावा केला होता. दरम्यान भाजपा आणि विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. Maharashtra Assembly Elections 2024: पैसे वाटल्याच्या आरोपावर भाजप नेते विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण; EC ने दाखल केला एफआयआर (Video) .

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif