Aurangzeb Effigy Burning Issue: औरंगजेबचा पुतळा जाळणे मनसे नेता संदीप देशपांडे यांना भोवलं, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल
कोल्हापूर आणि अहमदनगर येथे औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून मोठा वाद उफाळला. या संपूर्ण प्रकाराचा निषेधार्थ दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने बुधवारी आंदोलन केले.
दादर येथील शिवाजी पार्क परिसरात बेकायदा जमाव गोळा करून औरंगजेबचा पुतळा जाळण्याप्रकरणी मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि अहमदनगर येथे औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून मोठा वाद उफाळला. या संपूर्ण प्रकाराचा निषेधार्थ दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने बुधवारी आंदोलन केले. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथे औरंगजेबाचा पुतळा जाळला.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)