Case Files Over Illegal Banners: मुंबईच्या विलेपार्ले येथे लावले अमित शहा यांचे स्वागत करणारे बेकायदेशीर बॅनर; BMC ने दाखल केला गुन्हा

10 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.23 च्या सुमारास त्यांना अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे बेकायदेशीर बॅनरची माहिती मिळाली.

BMC (File Image)

Case Files Over Illegal Banners: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत करणारे ‘बेकायदेशीर बॅनर’ उभारल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आगामी राज्य निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचे लोकार्पण करण्यासाठी शाह रविवारी मुंबईत आले होते. यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गासह (WEH) बहार जंक्शन आणि सेंटॉर ब्रिज, विलेपार्ले दरम्यान स्ट्रीटलाइटच्या खांबांवर आठ अनधिकृत बॅनर लावण्यात आले होते. बीएमसीच्या के वॉर्डच्या तक्रारीनंतर, बॅनरबाबत 10 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

एफआयआरनुसार, सचिन गायकवाड यांनी तक्रार दाखल केली होती, जे के वॉर्डमधील जाहिरात निरीक्षक आहेत. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.23 च्या सुमारास त्यांना अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे बेकायदेशीर बॅनरची माहिती मिळाली. त्यानंतर, गायकवाड यांनी दोन सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांना आठ होर्डिंग्ज आढळून आली. त्यानंतर बीएमसीच्या पथकाने पग होर्डिंग्ज काढून टाकली. चौकशी करूनही हे बॅनर कोणी लावले हे समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या गेल्या महिन्यात दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा: राजकारण डायलॉग: 'मिंध्याचा टेलिप्रॉम्प्टर कोण?... धरण फोडणारा खेकडा'; Uddhav Thackeray यांची सीएम शिंदे व तानाजी सावंत यांच्यावर टीका)

Case Files Over Illegal Banners:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif