Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, बुलडाण्याजवळ कारला अपघात; 6 जण जखमी
या अपघाताच तपास सध्या बुलडाणा पोलिसांकडून सुरु आहे.
राज्यात नव्याने बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघात काही केल्या कमी होत नाही आहे. उद्धाटनापासून अनेक वेळा या महामार्गावर अनेक छोटे मोठे अपघात घडल्याचे घटना या घडल्याचे दिसून येत आहे. या अपघातांच्या मालिकेत अनेकांनी आपले प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. अशामध्ये या महामार्गावर पुन्हा अपघात झाला आहे. बुलडाण्याजवळ समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात (Car Accident) झाला. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून (Buldhana Police) सुरु आहे. (हेही वाचा - Amravati Accident: अमरावतीत बस दरीत उलटून झाडांमध्ये अडकली; चालकासह 7 प्रवासी जखमी)
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर गावाजवळ ही घटना घडली आहे. भरधाव कार उलटून अपघात झाला. या कारने चार वेळा पलट्या घेतल्या. अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर एअर बॅग उघडल्यामुळे चालक आणि एक जण सुखरुप वाचले. तर इतर जण जखमी झाले. कारची अवस्था पाहून अपघातामध्ये कोणची वाचले नसावे असे वाटत आहे. या अपघातामध्ये कोणाच्या डोक्याला, नाकाला आणि हाताला दुखापत झाली आहे. तर एकाचा हात फॅक्चर झाला आहे. कारची एअर बॅग वेळीच उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला
अपघातग्रस्त कार नागपूरच्या दिशेने जात होती. कुसुंबा येथील कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्यासह शाळेचे दोघे प्राचार्य आणि तीन कर्मचारी नागपूरला निघाले होते. त्याचवेळी बुलडाण्याजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. अपघातानंतर एका ट्रक चालकाने रुग्णवाहिका बोलावली त्यानंतर सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताच तपास सध्या बुलडाणा पोलिसांकडून सुरु आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)