Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडी परिसरात NDRF च्या मदतीला श्वानपथक; पहा बचावकार्याची ताजी दृष्य (Watch Video)

आज गडावर श्वानपथकाच्या मदतीने कोणी मातीच्या ढिगार्‍याखाली अडकला असेल तर त्याला मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

NDRF Canine squad | Twitter

रायगड मधील इर्शाळवाडी परिसरात दरड कोसळून आता 30 तासांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. सलग दुसर्‍या दिवशी एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी बचावकार्यात दाखल आहे. आज गडावर श्वानपथकाच्या मदतीने कोणी मातीच्या ढिगार्‍याखाली अडकला असेल तर त्याला मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने सर्वत्र चिखल झालेल्या या भागात एनडीआरएफ प्रतिकुल परिस्थितीमध्ये मदत करत आहे. नक्की वाचा: Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडीत सलग दुसर्‍या दिवशी बचावकार्य सुरू; मृतांचा आकडा 16 वर! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now